आयुष्य – एक सर्व्हर
सर्व्हर – म्हणजे जो सर्व्ह करतो तो सर्व्हर,कधीही रिक्वेस्ट आली की डाटा सर्व्ह करायचं काम ज्याकडे असतो तो सर्व्हर, आता सर्व्हर म्हणजे ते मशीन जे अहोरात्र, न थकता,न थांबता चालुच असतं,अगदी दिवसाचे चोविस तास,आठवड्याचे सातही दिवस,अगदी वर्षभर,आयुष्यभर,जो पर्यंत चालण्याची शक्ती आहे...