आशुतोष ब्लॉग

मोफत ब्लॉग – blogger की wordpress

संगणक क्षेत्रात युनिकोडचे आगमन होताच भारतीय भाषांना देखील संगणकीय सोपे रूप प्राप्त झाले.कधीकाळी महादिव्य अशा कसोट्या पार करत संगणकावर मराठी लेखन करावे लागत असे जे की आता अत्यंत सोपे काम झाले आहे.वाऱ्यावरती लिहावे तसे वेगाने मराठी अक्षरे संगणकाच्या पडद्यावर उमटवणे आता सहज शक्य झाले.किंबहुना बहुसंख्य आधुनिक मराठी प्रेमी युवा पिढीने ते सहजगत्या अवगत देखील केले आहे.आणि यातून अधिक एक नवे व्यासपीठ खुले होते ते म्हणजे आधुनिक साहित्याचे.

नव्या पिढीच्या लेखकांना व्यक्त होण्यासाठी सहज सोपे साधन म्हणजे ब्लॉग्स.अगदी घरी बसल्या हजारो वाचकांपर्यंत आपले विचार अन लेखन पोचवणे ते हि अगदी मोफत किंवा अत्यल्प खर्चात आता सहज शक्य आहे.ब्लॉग्स चे विश्व खुले होताच अनेकानेक लेखकांनी त्याची मदत घेत आपले विविध ब्लॉग सुरु करून मराठी लेखनाला प्रसिद्धी दिली आहे.

याउपर आजही अनेक लेखक आपले ब्लॉग्स सुरु करण्याच्या विचारात आहेत,त्यांच्या करीतच हा लेख.या लेखातून मोफत ब्लॉग सुरु करण्याचे दोन उत्तम पर्याय यांच्याबद्दल मी लिहित आहे.हे दोनही पर्याय ब्लॉगिंग ची सुरुवात म्हणून अत्यंत उत्तम आहेत,पण आपली वाटचाल केवळ ह्याच मोफत पर्यायांवर होत राहणे सोयीचे नाही,जसजसी वाचक संख्या वाढेल तसे आपण हे मोफत आणि कमी सोयी उपलब्ध असलेले पर्याय सोडून अधिक मोठ्या पर्यायांकडे जाने आवश्यक आहे.

यात मी blogger आणि wordpress.com (wordpress.org नव्हे) ह्या दोन्हीही मोफत पर्यायांची माहिती देणार आहे.

 

blogger आणि wordpress बद्दल थोडक्यात:

blogger.com आणि wordpress.com हे दोनही मोफत ब्लॉग सुरु करण्याची सोय उपलब्ध करून देतात.आणि या दोन्ही ठिकाणी मोफत स्वरुपात एक सब-डोमेन स्वरुपात आपला ब्लॉग आपण सुरु करू शकतो.सब डोमेन म्हणजे  ashutoshblog.wordpress.com किंवा ashutosh.blogspot.com अशा स्वरूपाचे,यात आपण निवडलेल्या ब्लॉग च्या नावापुढे ज्याचे सोय आपण वापरतो त्याचे डोमेन नेम लावले जाते.त्यामुळे केवळ आपले डोमेन असलेला आपला ब्लॉग यात असत नाही.

याच दोहों प्रमाणे अनेक सोयी उपलब्ध आहेत मात्र काही कारणांमुळे त्या फारश्या लोकप्रिय झाल्या नाहीत.म्हणून मी केवळ wordpress.com आणि blogger.com ह्यांबद्दल लिहित आहे.

blogger किंवा wordpress यांच्या वेबसाईट वर जाऊन मोफत नोंदणी करून काही क्षणात आपण आपला  ब्लॉग कार्यान्वित करू शकता,त्याकरिता केवळ प्राथमिक नोंदणी आवश्यक असते अन कसलेही पैसे देण्याची गरज असत नाही.

यापैकी blogger.com हे संपूर्णपणे मोफत आणि गुगल च्या मालकीचे साधन आहे.तर wordpress.com हे एक लोकप्रिय सी.एम.एस. अर्थात Content Management System वापरून तयार केलेलं साधन आहे.जे wordpress.org वरून मोफत डाउनलोड करून आपणही स्वतःचा अत्याधिक वैशिष्ट्य युक्त ब्लॉग तयार करू शकतो.

हा माझा ब्लॉग ashutoshblog.in हा देखील हेच CMS वापरून निर्माण केलेला आहे.

 

blogger की wordpress?

मुळात पाहता यावर blogger किंवा wordpress असे नेमके एकच उत्तर देणे तसे थोडे अवघडच आहे.नेमकी कोणती सुविधा वापरायची हे पूर्णतः आपण ब्लॉग कशावर आणि का तयार करीत आहोत ह्यावर ठरते.

आपण केवळ साधा लिखित स्वरूपाचा, केवळ हौस म्हणून ब्लॉग बनवणार असू जिथे विचार व्यक्त करायचे आहेत अन ब्लॉग च्या दिसण्याला फारसे महत्व नाही अशा ब्लॉगर्स नि blogger.com च्या सोप्या पर्यायाचा विचार घ्यावा.कारण blogger.com चे ब्लॉग्स हे थोड्या फार प्रमाणात एकसारखेच असतात अन पाहता क्षणी हा ब्लॉग blogger द्वारे बनवला असल्याचे सहज लक्षात येते.यात ब्लॉग चे रंगरूप बदलण्याचे फार थोडे पर्याय उपलब्ध असतात.त्यामुळे ज्यांना ब्लॉगच्या डिजाईन ने फरक पडत नाही अशांनीच blogger.com चा पर्याय स्वीकारावा.

याउलट काही हौशी छायाचित्रकार मात्र blogger.com च्या जुन्या ब्लॉग सारख्या रुपाला स्वीकारू शकत नाहीत,त्यांना आपल्या फोटो चे सादरीकरण देखील सुंदर पद्धतीने व्हावे असे वाटणे शक्य आहे. त्यामुळे ज्या ब्लॉगर्स न आपल्या ब्लॉग च्या डिजाईन वर देखील भर द्यायचा आहे अशांनी मात्र blogger.com ऐवजी wordpress.com चा आधार घेणे जास्त उपयुक्त ठरते. तसे पाहता wordpress.com वर देखील Customization फारसे उपलब्ध नाही,त्या सर्व सोयी ह्या wordpress.org द्वारा आहेत,पण ते जरासे खर्चिक अन तांत्रिकदृष्ट्या किचकट कार्य आहे.त्यामुळे छायाचित्रकार,चित्रकार,कुठल्याही प्रकारचे कलाकार ह्यांनी wordpress.com चा पर्याय वापरावा असे माझे मत आहे.

 

हे झाले थोडक्यात wordpress आणि blogger बद्दल, आता जरा खोलात दोन्ही सुविधांची माहिती मी लिहितो.

 

१. blogger.com (किंवा blogspot.com)

सुरुवात करायला अत्यंत सोपे अन कसलेही तांत्रिक ज्ञान नसताना केवळ ई-मेल हाताळावे इतके सोपे असलेली हि सुविधा,मात्र अत्यंत कमी सोयींची उपलब्धता यांमुळे हे जरासे जुनाट वळणाचे,फारसे व्यावसायिक वाटत नाही.तरीही ब्लॉग लिहिण्याची सुरुवात म्हणून हाच पर्याय उत्तम ठरतो.

 

वैशिष्ट्ये:

१.कसलेही पैसे न देता,सर्वच सोयी अगदी मोफत तेही कुठल्याही जाहिराती विना.

२.एखादा ई-मेल लिहावा तसे काही मिनिटांत आपला ब्लॉग सुरु करण्याची सोय.

३.ब्लॉग आपोआप गुगल सर्च ला इंडेक्स होतो.

४.ब्लॉग च्या backup आणि सुरक्षिततेची कसलीच काळजी नाही,सर्व काही आपोआपच होते.

५.काही प्रमाणात Customization.

६.आपला स्वतःचा डोमेन अगदी मोफत blogger ला जोडता येऊ शकतो.

७.अमर्याद संख्येने फोटो विडीयो सादर करण्याची सोय.

 

उणीवा:

१.ब्लॉग लिंक्स चे structure बदलण्याची सोय नाही,जे कि SEO सर्च इंजिन ला दिसण्याकरिता आवश्यक असते.

२.उपलब्ध themes ची अत्यंत कमी संख्या.त्यामुळे ब्लॉग चा चेहेरा मोहरा फारसा बदलणे अवघड जाते.

३.सर्वात महत्वाचे,तांत्रिकदृष्ट्या तुमच्या ब्लॉग ची संपूर्ण मालकी तुमच्या कडे राहत नाही,ती राहते गुगल कडे.अगदी क्षुल्लक कारणांवरून गुगल तुमचा ब्लॉग कसल्याही सुचनेविना कधीही बंद करू शकतो.यापूर्वी माझा मोफत सोफ्टवेअर बद्दलचा ब्लॉग देखील अशाच पद्धतीने बंद करून टाकला होता.

४.मुख्य गोष्ट, गुगल ने हि सुविधा गेल्या कित्येक वर्षांत कधीही अपडेट केलेली नाही.किंवा त्याच्या भविष्यातील योजनांची माहिती दिलेली नाही.त्यामुळे या सुविधेवर विश्वास ठेवणे म्हणजे जुगार ठरू शकतो.

 

२.wordpress.com

समजण्यास थोडे अवघड वाटत असले तरी एकदा जाणून घेतल्यावर याच्या इतके सोयीस्कर असे दुसरे ब्लॉग साधन नाही.उलटपक्षी जास्त customization असल्याने आपला ब्लॉग अधिकाधिक सोयीयुक्त व सुंदर होत जाणार आहे.

 

वैशिष्ट्ये:

१.अमर्याद मोफत.

२.सुरक्षा,backup इत्यादींची काळजी नाही.

३.ब्लॉग च्या सुविधा वाढवण्याची सोय.

४.सध्याचे डोमेन वापरण्याची सोय ($१३ )

५.मोफत थीम ऐवजी जास्त सोयींयुक्त थीम्स विकत घेऊन वापरता येण्याची सोय.

उणीवा:

१.तुमच्या ब्लॉग वर जाहिराती दाखवल्या जाण्याची शक्यता.

२.थर्ड पार्टी प्लगइन्स वापरता येत नाहीत.

३.आपल्याला हवे तसे कोड सामावून घेता येत नाहीत.

४.अत्यंत कमी स्टोरेज, केवळ ३ जीबी.

 

थोडक्यात मोफत ब्लॉग सुरु करण्यात आपल्या गरजेनुसार सुविधा निवडणे आवश्यक आहे.ह्या लेखातून सर्वच गोष्टी मांडणे शक्य झालेले नाही,पण अत्यंत थोडक्यात त्या सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.याउपर मराठी लेखकांना आपला ब्लॉग सुरु करण्यात अडचणी असल्यास किंवा त्याबद्दल कसलेही मार्गदर्शन हवे असल्यास केवळ मराठी लेखकांना मी मोफत देऊ करीत आहे.त्याकरिता आपण मला ब्लॉग द्वारे संपर्क करू शकता.

Exit mobile version