इतर

Showing 10 of 24 Results

‘एआय’ एक वास्तव की गैरसमज?

गेल्या काही वर्षांपासून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) हा शब्द आपल्या रोजच्या चर्चेचा भाग बनला आहे. पण एआय म्हणजे नेमकं काय, त्याचा उपयोग कसा होतो आणि भविष्यात तो आपल्या आयुष्यावर कसा परिणाम […]

नारायणराव पवार :  ज्याने थेट निजामावरच बॉम्ब फेकला

हैदराबाद स्टेट, निजामाच्या हैदराबाद राज्यात अत्याचारांचे स्तोम माजले होते ह्यात दुमत नाहीच. सर्वच गोष्टींत दडपशाही, लोकांचे अनन्वित छळ, हिंदूंच्या धार्मिक गोष्टींवर बंदी, रझाकारांचे अत्याचार या गोष्टींमुळे जनतेत असलेल्या यत्किंचितही तमा […]

गोदावरीबाई टेके : मराठवाडा मुक्तिसंग्रामातील रणरागिणीची शौर्यगाथा

गोदावरी बाई टेके – हे नाव ऐकल्याचे तुम्हाला स्मरते का? बालभारतीच्या चौथीच्या पुस्तकात हे नाव होतं, आता विस्मृतीत गेलं असेल कदाचित… रझाकारांच्या अत्याचारात दबलेल्या मराठवाड्यातल्या अनेक वीरकथा अशाच विस्मृतीत गेलेल्या. […]

पेपरची घडी आणि अनुभवाची जोडी

मी शाळेत असताना मला वृत्तपत्रं वाचायची खूप सवय होती. त्यावेळी गावावरून आजोबा आले तर सकाळी सर्वात आधी ते वृत्तपत्र वाचत. पलंगावर लोडला टेकून पेपर वाचताना त्या पेपरच्या घड्या, उलट्या – […]

चेंगराचेंगरीचा गोंधळ

एका नंतर एक चेंगरा चेंगरीच्या होणाऱ्या घटना पाहता, शाळेत शिकवलेली रांगेत चालण्याची शिस्त आपण लोक शाळा संपताच विसरून गेलो का असे वाटून जाते. सार्वजनिक ठिकाणी प्रशासनाने कितीही व्यवस्था केली तरी […]

शिकण्याची बदललेली पद्धत

आज एका सोबतच्या इंजिनियर मुलाशी बोललो. नुकताच नौकरीला लागला आहे आणि चांगलं कामही करतो. हा मुलगा माझ्यापेक्षा १० – १२ वर्षे लहान आहे, म्हणजे एक पिढी मागे. याच्याशी बोलण्यातून मला […]

सामान्यांचे अर्थकारण

पत्रपेटीच्या आकारात असलेला हा एक गल्ला आहे. मी लहान असताना आमच्या घरी काचेचं कपाट होतं, त्यात दिखाव्यासाठी म्हणून आईने हा आणला होता. नंतर तो अडगळीत पडला होता, मला सापडला तेव्हा […]

चाकोरी बाहेरचा प्रवास

तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याने ड्राईव्ह करून गेलो होतो. त्यावेळी मला या भागाची शून्य कल्पना होती. रस्ता कसा आहे, कुठून जातो, वातावरण कसे असते याची काहीही कल्पना नव्हती. लोणावळा […]

आजोबा – आठवणीरूपी परताव्यासाठी एका छोट्या क्षणाची गुंतवणूक

काल रात्री जेवायला एका हॉटेलात गेलो होतो. शेजारच्या टेबलवर एक आजोबा आणि त्यांची लाडकी नात येऊन बसले. नात लाडकीच होती, हे त्या आजोबांचे हावभाव पाहून समजत होतं. नात उड्या मारत […]

आयुष्याची स्पर्धा

माझ्या आयुष्यातले पहिले परितोषक मला गणेशोत्सवात मिळाले होते. आम्ही सिडको मध्ये नवीन रहायला आलो तेव्हा आमच्या घराजवळ लोकमान्य गणेश मंडळ होते. तिथे गणेशोत्सवाचे दहा दिवस भरपूर सारे सांस्कृतिक कार्यक्रम असत. […]