Computer Science की Cybersecurity / AI ML / Data Science Branch? इंजिनियरिंगला काय घ्यावे?

इंजिनियरिंगला Computer Science घेऊ की Computer Science & Cybersecurity / AI ML / DS

हा प्रश्न अनेकांना पडतो आहे.

कुठलीही ब्रांच घ्या मित्रांनो, सर्व एकसारख्याच आहेत . कॉलेजचे इंटेक वाढवण्यासाठी एकाच ब्रांच ला वेगवेगळी नावं दिली आहेत. त्यामुळे कॉलेजचे सीट वाढलेत.

हे थोडं सविस्तर आहे, पण अनेकांना प्रश्नाचे उत्तर मिळेल. Confusion दूर होईल. खाली वाचा.

➡️ आयटीच्या कुठल्याही टेक्निकल क्षेत्रात करिअर करायचे तर बेस संगणकशास्त्राचे ज्ञान आवश्यक असते. त्यासाठी अमुक एक विषय शिकला पाहिजे असं नसतं. मेकॅनिकल, केमिकल, प्लास्टिक पॉलिमर इंजिनियर झालेली पोरं आयटी मध्ये येऊ शकतात इतकं आयटी पसरलेले आहे. त्यामुळे computer science ला कायम महत्त्व आहे.

➡️ Cybersecurity, AI ML, Data Science हे कॉम्प्युटर क्षेत्रातले डोमेन आहेत, त्यामुळे कुणीही कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर या कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकतो.

➡️ तुम्ही चारही ब्रांचेस च्या सिलॅबस ची तुलना करा, लक्षात येईल ९०% विषय सेमीस्टर बदलून , किंवा विषयाचं नाव बदलून सगळ्या ब्रांचलां सारखेच आहेत.

➡️ Cybersecurity, AI-ML, Data Science ब्रांच ला एक किंवा दोनच विषय थोडेफार वेगळे असतात. ज्यामुळे आपण खूप वेगळं शिकत नाही तर थोडासाच फरक त्या विषयाला निगडित आहे.

➡️ सायबर सिक्युरिटी हे करिअर असं आहे ज्यात तुमचं मूळ Computer Science चे ज्ञान पक्कं असावं लागतं. म्हणजे तुम्हाला करिअर दृष्टीने अभ्यास शेवटी कॉम्प्युटर सायन्स चाच करायचा आहे. केवळ दोन विषय cyber security चे घेतल्याने खूप मोठा फरक पडत नाही.

➡️ तुम्ही Cybersecurity विषय घेतल्याने Cybersecurity ची नोकरी मिळेल असं नाही. आणि computer science घेतल्याने cybersecurity करिअर घडत नाही असंही काही नाही. तुम्ही कोणताही विषय घेऊन सायबर सिक्युरिटी, AI ML, DS करू शकता. 

➡️ असे विषय कॉलेजने का काढलेत? कारण तेच शिक्षक, त्याच लॅब वापरून कॉलेजची in-take capacity वाढवता येते, हे एकप्रकारचे मार्केटिंग आहे. ह्यात syllabus मध्ये विशेष फरक दिसतच नाही तर उगी गंगाधर चे कपडे बदलून त्याला शक्तिमान बनवलं आहे. 

पाच सहा ठिकाणचा अभ्यास करून मी माझं मत बनवलं आहे. आपण Computer Science घेतलं काय आणि Cybersecurity/ AI ML / Data Science घेतलं काय फक्त डिग्रीचे नाव बदलणार आहे.

मग आपण काय करायचं.?

चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या. ज्या कॉलेज आणि विद्यापीठाचे नाव चांगले आहे. चांगल्या कॉलेजमध्ये जी ब्रांच मिळत असेल ती घ्या, म्हणजे कॉलेजच्या नावाजले असण्याचा करिअरच्या सुरुवातीला फायदा होतो. 

एखाद्याला केवळ आणि केवळ cyber security मध्येच करिअर करायचे आहे हे आज नक्की ठरले असेल तरच त्या ब्रांच च्या मागे लागा. 

आज आहे ते आयटी क्षेत्राचे चित्र पुढच्या चार वर्षात बरेच बदललेले असेल हे लक्षात घ्या आणि त्या नुसार आपले निर्णय घ्या.

मला अशी अपेक्षा आहे की अनेकांना उत्तरे मिळून गोंधळ कमी झाला असेल. मला असे अनेक प्रश्न अनेकदा विचारतात, गेल्या आठवड्यात मला हा प्रश्न तीन चार ठिकाणी विचारला त्यामुळे हा प्रश्न अनेकांना पडत असेल असे वाटते म्हणून हे उत्तर लिहायचा प्रयत्न.

अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचाराच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *