मराठी

Showing 10 of 72 Results

प्रवास – अनुभवांची शिदोरी

आयुष्य हा एक प्रवास आहे आणि ह्या आयुष्यात अनेक प्रवास आहेत. भाकरीच्या शिदोऱ्या बांधून प्रवासाला निघतात, अन अनुभवांच्या शिदोऱ्या घेऊन घरी परततात. आयुष्यातला प्रत्येक प्रवास काहीतरी नवीन अनुभव घेऊन येतो आणि बरंच काही शिकवून जातो.

रम्य ही स्वर्गाहून लंका

श्रीलंका म्हणजे काय, भारताने टाकलेला पोलिओ ड्रोप म्हणून आपण भारतीय हिणवणार. ज्याची गणना आपण रावणाची लंका म्हणून करतो त्या देशाचे चित्र मनात रंगवताना अवघड जात होते. आपण भारतीयांना आपल्यासमोर इतरांना तुच्छ लेखण्याची जी खोड आहे, त्यानुसार श्रीलंका हा गरीब मागासलेला देश असावा अन सर्वत्र बकाली अन अविकसित अवस्था असावी असा कल्पना विलास मी केला होता. आपण भारतीय, आपण श्रेष्ठ, आपण विकसित असा मस्तवाल गर्व घेऊन मी निगाम्बो विमानतळावर उतरलो.

हॅकिंग आणि गैरसमज

सायबर सुरक्षेचा एक अलिखित नियम आहे, तो असा की तुम्ही कितीही सुरक्षा बाळगा तुम्ही हॅकिंग रोखू शकत नाही. कारण सायबर हल्ला कोणत्या प्रकारे होईल हे हल्ला होई पर्यंत कुणीही सांगू शकत नाही. एखादा नवीन प्रकारचा हल्ला सायबर तज्ज्ञांना तेव्हाच सापडतो जेव्हा तो हल्ला प्रत्यक्षात होतो अन त्यानंतरच त्यावर उपाय करता येतात. त्यामुळे हा हल्ला देखील कसा झाला ह्याचा अभ्यास करून, भविष्यात तो दुसऱ्या कुठल्या संस्थेवर केला जाऊ नये ह्यावर उपाय शोधता येतील.

UIDAI क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असल्यास घाबरण्याचे कारण नाही

UIDAI क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये असल्यास घाबरण्याचे कारण नाही सगळ्या सोशल मीडियावर सध्या अनेकांच्या अँड्रॉइड फोन मध्ये UIDAI च्या नावाने क्रमांक सेव्ह असल्यास तो डिलीट करून टाका असे मेसेज फिरत […]

पाउस आणि त्याच्या छटा

निसर्गाचं एक वैशिष्ट्य आहे,निसर्गनिर्मित प्रत्येक गोष्टीला अनेक छटा असतात,म्हणजे आपण निसर्गाकडे पाहू त्या नजरेने निसर्ग आपल्याला वेगळा दिसतो,आपण हवा तो अर्थ त्या निसर्गातल्या गोष्टींचा अन हालचालींचा काढू शकतो, आता जून […]

धावणाऱ्यांची मुंबई

मुंबई, तसं ह्या विषयावर नेहमीच लिहिलं जातं, विविधांगी आणि विविध पद्धतीने मुंबई बद्दलची माहिती रोजच कुठून येतच असते त्यात मी त्या विषयावर चार ओळी लिहिणं म्हणजे समुद्रात खडेमिठाचे तुकडे फेकून […]

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल थोडंसं

शाळेत असताना भारतीय स्वातंत्र्याचा लढा शिकवताना ‘सशस्त्र क्रांतिकारकांचे योगदान’ विषयावर एक छोटेखानी धडा असायचा, त्यात विनायक दामोदर सावरकर नावाच्या माणसाने इंग्लंडमधून भारतात पिस्तुलं पाठवली म्हणून कसलीतरी काळ्या पाण्याची शिक्षा झाली […]

रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव

रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव   व्हायरस…! अगदी सामान्य कामांसाठी संगणक आणि मोबाईल वापरणाऱ्या कुणालाही ज्याची सर्वात जास्त भीती असते अशी एक गोष्ट म्हणजे व्हायरस.कारण […]

देवगिरीचे यादव

संभाजीनगर म्हणजे दख्खनप्रदेशाची ‘खिडकी’ आणि इतिहासातल्या गोष्टी सांगतात त्याप्रमाणे उत्तरेतल्या शक्तींना दक्षिणेकडे विशेषतः सातपुडा डोंगरांच्या पलीकडे सह्याद्रीला लागून असलेल्या ह्या सुपीक प्रदेशात उतरण्याच्या एक प्रमुख मार्ग म्हणजे आजचे संभाजीनगर आणि आसपासचा प्रदेश. त्यात सर्व प्रदेशावर नियंत्रण ठेऊ शकेल असा एकमेव,अभेद्य किल्ला देवगिरी.

मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान

आपल्या बहरलेल्या ऐतिहासिक पुस्तकांच्या पानांतून अनेक आश्चर्यकारक गोष्टींना जन्म देणारा हा भारतीय इतिहास काही गूढ व्यक्तींना आपल्या जीर्ण पानांतून दडवून ठेवतो अन त्यापैकीच एक म्हणजे मलिक अंबर. दख्खन च्या इतिहासात मराठेशाही च्या पराक्रमाने मुघलांच्या नाकात दम करण्यापूर्वी मुघलांना विशेषतः बादशाह जहांगीरला त्रस्त करून सोडण्याचं काम करणारा मलिक अंबर हा एक चकित करणारा योद्धा.