सायबर सिक्युरिटी

6 Results

क्राऊड स्ट्राईक कांड – एका चुकलेल्या अपडेटची कहाणी

काल दिवसभर ( दिनांक १९ जुलै २०२४) सगळीकडे बंद पडलेल्या संगणकांची चर्चा होती. संगणक बंद पडल्यामुळे विमानतळाचे कामकाज अडकले, कंपन्यांची कामे थांबली अशा अनेक बातम्या होत्या.आम्ही आयटीवाले त्यावर विनोद करून […]

सायबर गुन्हे आणि मानवी भावना

सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. फ्रॉड करणारे रोज नवीन क्लृप्त्या लढवून लोकांचे पैसे पळवतात आणि या घटना वाढतच आहे. कधी विचार केला आहे का, की हे सायबर गुन्हेगार आपल्या मानवी भावनांचा, विचार करण्याच्या पद्धतीचा आधार घेऊन आपल्याला फसवतात? आर्थिक सायबर गुन्ह्यांना बळी पडताना एखाद्याच्या डोक्यात काय विचार येत असतील. फसवणूक होत असताना माणसाला स्वतःला का लक्षात येत नसेल याचा विचार मी करत होतो.

सावधान! राम मंदिर सोहळा आणि सायबर गुन्हेगारांची लबाडी

सायबर गुन्हेगारांची खासियत असते. जिथे गर्दी तिथे हॅकर्स दर्दी असे म्हणायला हरकत नाही. राम मंदिर स्थापना सारख्या लोकप्रिय घटनेचा गैरफायदा उचलणार नाहीत ते हॅकर्स कसले. हीच संधी साधून सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत आणि आता आंतरजालावर अनेक फ्रॉड & स्कॅम पसरवले आहेत. यातून आपल्या सारख्या सामान्य भाविकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.

आपल्या घरचा वायफाय राऊटर कसा सुरक्षित करायचा?

जेव्हा आपण घरात वायफाय लावतो तेव्हा त्याच्या जोडण्या देऊन आपल्याला इंटरनेट मिळाले की काम झाले असे नसते. त्याची देखभाल आणि सुरक्षेची आपणच काळजी घेतली पाहिजे.

हॅकिंग आणि गैरसमज

सायबर सुरक्षेचा एक अलिखित नियम आहे, तो असा की तुम्ही कितीही सुरक्षा बाळगा तुम्ही हॅकिंग रोखू शकत नाही. कारण सायबर हल्ला कोणत्या प्रकारे होईल हे हल्ला होई पर्यंत कुणीही सांगू शकत नाही. एखादा नवीन प्रकारचा हल्ला सायबर तज्ज्ञांना तेव्हाच सापडतो जेव्हा तो हल्ला प्रत्यक्षात होतो अन त्यानंतरच त्यावर उपाय करता येतात. त्यामुळे हा हल्ला देखील कसा झाला ह्याचा अभ्यास करून, भविष्यात तो दुसऱ्या कुठल्या संस्थेवर केला जाऊ नये ह्यावर उपाय शोधता येतील.

रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव

रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव   व्हायरस…! अगदी सामान्य कामांसाठी संगणक आणि मोबाईल वापरणाऱ्या कुणालाही ज्याची सर्वात जास्त भीती असते अशी एक गोष्ट म्हणजे व्हायरस.कारण […]