Marathi Blog

Showing 10 of 75 Results

चिवडा

खायला काहीतरी घरात असावं म्हणून हा चिवडा आई करून ठेवायची. तो फार गोड नसायचा, फार तिखट सुद्धा नाही, त्याची आपली एक वेगळीच चव, अन ती चव कधी चुकली नाही. चिवडा म्हटलं की तीच चव जिभेवर रेंगाळते, दुसऱ्या कुठल्या चवीचा चिवडा असतो ही संकल्पनाच चुकीची आहे, कुणी दुसऱ्या चवीचा चिवडा बनवत असेल त्यांचा मी निषेध करायला तयार आहे.

मी, सिंगापूर आणि कोरोना व्हायरस

कोरोना व्हायरस बाधित देशांच्या यादीत चीन नंतर दुसरा क्रमांक सिंगापूरचाच होता. त्यात सिंगापूर हा चिनी लोकांचे बाहुल्य असलेला देश, आणि हा संपूर्ण जगाचा “ट्रान्झिट पॉईंट”, त्यामुळे इथे कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा धोका खूप जास्त आहे असाच सर्वत्र प्रचार होता.

अँटीव्हायरस बद्दल सर्वकाही

संगणक वापरणारा आणि व्हायरसचे नाव न ऐकलेला मनुष्य शोधून सापडणार नाही. व्हायरस येऊ द्यायचे नसतील तर अँटीव्हायरस वापरायचा हे माहित नसणारा माणूस केवळ परग्रहावर सापडावा. व्हायरस हा काही आजकाल आलेला प्रकार नाही,संगणक लोकप्रिय होत गेले तसे व्हायरस पसरत गेले. ह्या व्हायरसच्या मागोमाग नवीन संज्ञा उदयास आली, ती अँटीव्हायरस. ह्या अँटीव्हायरस बद्दल थोडी खोलातली माहिती लिहिण्याचा प्रयत्न मी करत आहे.

एचटीटीपी आणि एचटीटीपीएस मधला गोंधळ

गुगल क्रोम मध्ये कुठलीही वेबसाईट उघडली की डाव्या बाजूला लिहून येतं, “Not Secure’! ही नॉट सेक्युरची सूचना गोंधळात पाडते. ही वेबसाईट सुरक्षित नाही का अशी शंका निर्माण करते. आणि वेबसाईट […]

प्रवास – अनुभवांची शिदोरी

आयुष्य हा एक प्रवास आहे आणि ह्या आयुष्यात अनेक प्रवास आहेत. भाकरीच्या शिदोऱ्या बांधून प्रवासाला निघतात, अन अनुभवांच्या शिदोऱ्या घेऊन घरी परततात. आयुष्यातला प्रत्येक प्रवास काहीतरी नवीन अनुभव घेऊन येतो आणि बरंच काही शिकवून जातो.

रम्य ही स्वर्गाहून लंका

श्रीलंका म्हणजे काय, भारताने टाकलेला पोलिओ ड्रोप म्हणून आपण भारतीय हिणवणार. ज्याची गणना आपण रावणाची लंका म्हणून करतो त्या देशाचे चित्र मनात रंगवताना अवघड जात होते. आपण भारतीयांना आपल्यासमोर इतरांना तुच्छ लेखण्याची जी खोड आहे, त्यानुसार श्रीलंका हा गरीब मागासलेला देश असावा अन सर्वत्र बकाली अन अविकसित अवस्था असावी असा कल्पना विलास मी केला होता. आपण भारतीय, आपण श्रेष्ठ, आपण विकसित असा मस्तवाल गर्व घेऊन मी निगाम्बो विमानतळावर उतरलो.

हॅकिंग आणि गैरसमज

सायबर सुरक्षेचा एक अलिखित नियम आहे, तो असा की तुम्ही कितीही सुरक्षा बाळगा तुम्ही हॅकिंग रोखू शकत नाही. कारण सायबर हल्ला कोणत्या प्रकारे होईल हे हल्ला होई पर्यंत कुणीही सांगू शकत नाही. एखादा नवीन प्रकारचा हल्ला सायबर तज्ज्ञांना तेव्हाच सापडतो जेव्हा तो हल्ला प्रत्यक्षात होतो अन त्यानंतरच त्यावर उपाय करता येतात. त्यामुळे हा हल्ला देखील कसा झाला ह्याचा अभ्यास करून, भविष्यात तो दुसऱ्या कुठल्या संस्थेवर केला जाऊ नये ह्यावर उपाय शोधता येतील.

पाउस आणि त्याच्या छटा

निसर्गाचं एक वैशिष्ट्य आहे,निसर्गनिर्मित प्रत्येक गोष्टीला अनेक छटा असतात,म्हणजे आपण निसर्गाकडे पाहू त्या नजरेने निसर्ग आपल्याला वेगळा दिसतो,आपण हवा तो अर्थ त्या निसर्गातल्या गोष्टींचा अन हालचालींचा काढू शकतो, आता जून […]

धावणाऱ्यांची मुंबई

मुंबई, तसं ह्या विषयावर नेहमीच लिहिलं जातं, विविधांगी आणि विविध पद्धतीने मुंबई बद्दलची माहिती रोजच कुठून येतच असते त्यात मी त्या विषयावर चार ओळी लिहिणं म्हणजे समुद्रात खडेमिठाचे तुकडे फेकून […]

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल थोडंसं

शाळेत असताना भारतीय स्वातंत्र्याचा लढा शिकवताना ‘सशस्त्र क्रांतिकारकांचे योगदान’ विषयावर एक छोटेखानी धडा असायचा, त्यात विनायक दामोदर सावरकर नावाच्या माणसाने इंग्लंडमधून भारतात पिस्तुलं पाठवली म्हणून कसलीतरी काळ्या पाण्याची शिक्षा झाली […]