ए.टी.एम. कार्ड फसवेगिरी

ATM FRAUD(FAKE INQUIRY CALLS)
काल दुपारी अचानक एका अनोळखी number वरून फोन आला.उचलला असता पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण “भारतीय रिझर्व बँकेतून” बोलत असल्याचे सांगितले व तुमच्या ATM कार्ड चे Verification करण्याकरिता संपर्क केल्याचे तो सांगत होता.त्याने संपर्क केलेला क्रमांक, त्याला माझ्याबद्दल नसलेली माहिती ह्या वरून मला त्या व्यक्तीवर संशय आला व मी त्याला खोलात जाऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली.त्याने बरीच उडवा उडवीची उत्तरे देत शेवटी ‘तुमचेच ATM CARD ब्लॉक होईल मला काय त्याचे’ म्हणत फोन ठेवला.मी ह्या बाबतीत लगेच बँकेत चौकशी केली असता अशा प्रकारे कुठलेही Verification केले जात नसल्याचे कळाले.
हे सांगण्याचा उद्देश, आपणा सर्वाना एका नवीन धोक्याची ओळख करून देणे.मी ह्या पूर्वी लिहिलेल्या ‘Whatsapp साठी फेसबुक वर number देण्यातले धोके’ ह्या पोस्टचा पुढचा टप्पा म्हणजे हे Fraud. शक्य तितक्या सोप्या भाषेत आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे.
सर्वात प्रथम हे online भामटे काहीतरी मार्गाने तुमचा संपर्क क्रमांक मिळवतात,जमलेच तर तुमच्या बद्दल थोडीफार माहिती,जसे की,तुमचे नाव,राहते ठिकाण,तुमचा व्यवसाय इ. माहिती सुद्धा जमवतात.एकदा का तुमचा संपर्क क्रमांक मिळाला कि हे भामटे तुम्हाला संपर्क करतात आणि काही बाही खोटे बोलून ते कुठलेतरी अधिकारी असल्याचे भासवतात. ह्यात वर म्हटल्या प्रमाणे कुठल्यातरी बँकेचा अधिकारी किंवा बरेचदा तुमच्या मोबाईल नेटवर्क कंपनी चा अधिकारी असल्याचे सांगत तुम्हाला माहिती विचारतात.
१. हे लोक तुमचा विश्वास बसावा ह्या करिता तुमची साधारण सर्वज्ञात माहिती तुम्हालाच सांगून भुलवण्याचा प्रयत्न करतात.ज्याद्वारे तुमचा त्यांच्यावर विश्वास बसू शकतो.
२. हे तुमच्या ATM / CREDIT कार्ड ची माहिती, बँक खात्याची माहिती, Online खर्चाची माहिती इ. बद्दल विचारातील.कुठल्यातरी गोष्टीचा संदर्भ देत नेमकी हीच गोपनीय माहिती तुमच्या कडून काढून घेण्याचा ते प्रयत्न करतील.
३.कसली तरी तपासणी (Verification) आहे,कोणतीतरी सुविधा मोफत सुरु करायची आहे असे सांगत तुमचे मन त्या खोट्या गोष्टीकडे आकर्षित करण्याचा ते प्रयत्न करतील.
४. तुम्ही ऐकलेच नाहीत तर ‘तुमचे ATM कार्ड बंद होईल किंवा तुम्हाला Online Banking करता येणार नाही’ अशी काहीतरी खोटी भीती तुम्हाला दाखवून तुमच्या कडून माहिती काढण्याचा प्रयत्न करतील.

थोडक्यात काहीतरी कारण सांगून खोटे बोलून तुमच्या कडून तुमच्या ATM / CREDIT कार्ड, बँक खाते इत्यादीची माहिती काढून घेण्याचा हा प्रकार. पण हे सगळं करण्यात ह्या भामट्यांचा उद्देश्य काय असावा?
१. हि माहिती देताना ते तुमच्या कडून अर्थात प्रयत्न करतीलच कि तुमचा ATM PIN किंवा PASSWORD काढून घ्यावा. काही लोक सांगतात देखील, ज्यांनी सांगितला त्यांचे पैसे तर गेलेच म्हणून समजा.
२. ते तुमच्या ह्या माहिती सोबतच इतर माहिती देखील विचारू शकतात. उदा. तुमच्या वाहनाचा क्रमांक,तुमच्या पती/पत्नी/मुले/आई/वडील इत्यादींची नावे,तुमचा पत्ता,तुमचे छंद इ. बरेचदा आपण ह्याच गोष्टीना आपला ‘password’ म्हणून वापर करतो, हा एक धोका.
३. प्रत्येक वेळेस असे calls हे तुमचे account HACK करण्या करिताच असतात असे नाही, बरेचदा हे लोक मार्केट सर्वे करिता देखील संपर्क करितात. असे संपर्क करून मिळवलेली हि माहिती पुढे बरीच उपयोगात येते.
४. तुम्हाला कसली तरी lottery लागली आहे,किंवा बक्षीस मिळाले आहे त्याकरिता transfer फी म्हणून कंपनीकडे काही हजार जमा करा म्हणत तुम्हाला त्यांच्या बँक account ला पैसे जमा करण्यास सांगतील. (हि युक्ती मुख्यत्वे नायजेरियन भामटे वापरतात) आणि तुम्ही बक्षिसाच्या आमिषाने पैसे जमा करताच ते परागंदा होतात.

ह्या सर्वांवरच उपाय म्हणजे एकच, कुणी अशा प्रकारे खाजगी माहिती विचारू लागताच त्याला दोन हात दूर ठेवणे.अशा प्रकारे तुमची बँक काही तपासणी करते का ह्याची खात्री करून घ्या व मगच अशा calls ला उत्तरे द्या. जर विश्वास बसत नसेल तर पलीकडील व्यक्तीला त्याची ओळख पटवून देण्यास सांगा.त्या करिता तुम्ही त्याच्या कार्यालयाचा पत्ता,आणि तुमच्या बद्दल त्याला किती माहिती आहे हे तपासून पहा आणि शक्य तितक्या वेळेस अशा फोन calls ना टाळाच. अशा प्रकारे कुणालाही माहिती देणे धोक्याचेच आहे.
एखादे वेळेस चुकून तुम्ही अशी माहिती दिलीत आणि फसवले जात असल्याचे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही कधीही जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊ शकता आणि हो न विसरता तुमच्या बँकेला कळवून तुमचे खाते तात्पुरते बंद करू शकता.तक्रार करायला पुरावे आवश्यक असतात.

अशा अनेक पद्धती आणि युक्त्या आहेत ज्या द्वारे हे भामटे तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील.सर्वच काही इथे सांगणे शक्य नाही,पण एक साधारण माहिती देण्याचा हा प्रयत्न केला. तुम्ही सर्वांनी ह्या डिजिटल युगात सुरक्षित राहावे इतकाच माझा प्रयत्न.
अधिक माहिती हवी असल्यास comment चा पर्याय आहेच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.