इडलीवाला अण्णा

ट्विटरवर इडलीवाला अण्णा हे नाव मी अगदी सहज घेतले होते. काही वर्ष आधी, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनुसार आपले नाव ट्विटरवर लावायचे एक फॅड आले होते. प्रत्येकजण आलेला चित्रपट, एखादे पात्र, राजकीय […]

मामाची बाग

आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती अशा असतात ज्या आपल्या मनावर एक ठसा उमटवून जातात. बकुळीच्या फुलांचा सुगंध कसा बराच काळ दरवळत राहतो तशीच काही माणसं, त्यांचे स्वभाव, त्यांची शैली, खासियत यांची […]

संभाजीनगरचा पाणीप्रश्न

छत्रपती संभाजीनगर: जर तुम्हाला कुणीही अनोळखी व्यक्ती भेटली आणि तुम्हाला वेळ घालवण्यासाठी चर्चा करायची असेल तर एक हमखास विषय म्हणजे संभाजीनगरचा पाणीप्रश्न! कधीही, कुठेही, कुणाहीसोबत या विषयावर सहज चर्चा करू […]

आमची बदललेली पतंगबाजी

तीस चाळीस रुपयांत पतंगबाजी करणाऱ्या मला पतंगाच्या दुकानावर सातशे रुपयांचा युपीआय करताना पार जीवावर आले होते. तेव्हाच बदलत्या काळाची एक छटा अनुभवायला मिळाली.

गाणाऱ्याचे पोर

भीमसेन जोशी म्हणजे माझे आवडते गायक, मुखपृष्ठावर त्यांचा रेखलेला फोटो पाहून हे मी हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. आपल्या आवडत्या गायकाचे आयुष्य कसे होते ह्याची मला उत्सुकता लागली होती. त्यात गायकाच्या मुलाने लिहिलेले पुस्तक म्हटल्यावर उत्सुकता शिगेला पोचली होती. हे संपूर्ण पुस्तक भीमसेन जोशींच्या एका अज्ञात,अपरिचित व्यक्तिमत्वाच्या जवळ घेऊन जाते. प्रसिद्ध व्यक्तींच्या खाजगी आयुष्यातल्या आपल्या माहित असलेल्या अनेक गोष्टी असतात, पण भीमण्णांच्या माहित नसलेल्या एका अंगाची ओळख या पुस्तकातून झाली.

सायबर बुलिंग – गुंडगिरीचा आधुनिक चेहरा

विविध प्रकारचे सायबर गुन्हे आपल्याला माहीत आहेतच, अशात एक नवीन संज्ञा सध्या कानी पडत आहे ती म्हणजे सायबर बुलिंग. सायबर फ्रॉड, सायबर थेफ्ट, सायबर क्राइम अशा डिजिटल गुन्ह्यांच्या पंक्तीत बसणारे हे नाव नवीन आहे मात्र यात होणारे दुर्दैवी प्रकार मात्र प्रत्यक्ष आयुष्यात होणाऱ्या गुंडगिरीचे आधुनिक रूप आहे.

मी आणि माझी मराठी भाषा

मला इंग्रजीचा तिटकारा येतो, पण ती आजच्या काळात व्यवहारासाठी मला वापरावीच लागत आहे.
होता होईल तितकं शक्य आहे तिथे मी मराठीच वापरतो.

महाराष्ट्र राज्य ई-पास चे संकेतस्थळ अधिकृत आहे का?

आता काही कारणास्तव महाराष्ट्र सरकारची ‘इ-पास’ वेबसाईट बघितली. मी https://covid19.mhpolice.in ह्या संकेतस्थळा बद्दल बोलत आहे. हे संकेतस्थळ महाराष्ट्र राज्याचे अधिकृत संकेतस्थळ आहे अशी माझी धारणा आहे. हे संकेतस्थळ जर अधिकृत […]

आपल्या घरचा वायफाय राऊटर कसा सुरक्षित करायचा?

जेव्हा आपण घरात वायफाय लावतो तेव्हा त्याच्या जोडण्या देऊन आपल्याला इंटरनेट मिळाले की काम झाले असे नसते. त्याची देखभाल आणि सुरक्षेची आपणच काळजी घेतली पाहिजे.

चिवडा

खायला काहीतरी घरात असावं म्हणून हा चिवडा आई करून ठेवायची. तो फार गोड नसायचा, फार तिखट सुद्धा नाही, त्याची आपली एक वेगळीच चव, अन ती चव कधी चुकली नाही. चिवडा म्हटलं की तीच चव जिभेवर रेंगाळते, दुसऱ्या कुठल्या चवीचा चिवडा असतो ही संकल्पनाच चुकीची आहे, कुणी दुसऱ्या चवीचा चिवडा बनवत असेल त्यांचा मी निषेध करायला तयार आहे.