भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर

आपल्या निबंधामालेतून महाराष्ट्र राज्यात तेजस्वी राजकीय विचारांचा उगम घडवणाऱ्या भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची आज जयंती. ‘निबंधमाला’ या आपल्या लेखमालेतून त्यांनी ८४ विविध विषयांवर लिहिलेले लेख आजही प्रसिद्ध आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना जयंती निमित्त आदरयुक्त अभिवादन.

२० मे १८५० रोजी जन्मलेला या अवलिया ने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या सोबत देशात क्रांती घडवणारी “केसरी” व “मराठा” हि वृत्तपत्रे सुरु केली.पुण्यातील ब्रिटीश विद्यालयांपेक्षा उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून सुरु करण्यात आलेल्या “न्यू इंग्लिश स्कूल” च्या स्थापनेतही विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा सहभाग होता. महाराष्ट्राचा इतिहास व काव्य सहज सोपा लोकांपर्यंत पोचावा या करिता त्यांनी “काव्येतिहास” हि लेखमाला देखील प्रसिद्ध केली.

सोबतच आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा नामक दोन प्रकाशनसंस्था व वाचकांना सहज पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून पुण्यात “किताबखाना” नामक पुस्तकांचे भांडार ते चालवीत असत.
ते मुख्यत्वे ओळखले जातात ते त्यांच्या “निबंधमाला” या लेखमाले बद्दल,या लेखमालेतील “मुद्रणस्वातंत्र्य” व “आमच्या देशाची स्थिती” हे दोन लेख तत्काली खूप गाजलेले होत.
आपल्या लेखांतून जनजागृती करत ब्रिटीश सरकार व तत्कालीन मिशनरी वर प्रखर टीका करणाऱ्या, मराठी भाषेच्या जडणघडणीत मोलाचा वाट उचलणाऱ्या या “भाषाशिवाजी”ना जयंती निमित्त पुनःश्च कृतज्ञतापुर्वक अभिवादन.

Add a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.